Tejas Sonawale   (तेजस(परसू) सोनवले)
232 Followers · 494 Following

read more
Joined 6 April 2019


read more
Joined 6 April 2019
7 FEB 2020 AT 11:22

गडद अंधार बघून
जागा लपायला शोधली
सावलीचं गुपित ओळखून
रात्र पहाटेपर्यंत रेंगाळत राहिली

-


6 FEB 2020 AT 9:25

मरण भोगून झालं तरी
जन्माने जगण्याची तसदी लावली
कैक अर्धवट स्वप्नांचा प्रवास संपवून
वाट वेशिबाहेर येऊन थांबली

-


5 FEB 2020 AT 7:39

पुन्हा नव्याने वळचणीला ती
रातराणी बहरली
वळणावरच्या मार्गावर
कातरवेळ कानोसा घेत राहिली

-


3 FEB 2020 AT 11:47

अशी एक .....

गोड स्वप्नांच्या वाटेवर
अशी एक ....,
कडवट वाट येते
तुरट झालेल्या पावलांना ठेसकळून
खारट असावं डोळ्यात देऊन जाते...!

-


20 JAN 2020 AT 12:06

आठवणींच्या पेटत्या निखाय्रासोबत
प्रत्येक रात्र जागून निघते
वाऱ्याच्या गार गुलाबी स्पर्शाने
ह्रदयात धगधगती शेकोटी पेटते

-


5 DEC 2019 AT 7:05

तुझं हसणं आठवून
कधी कधी रडायला येतं
ज्या तळ्याकाठी प्रेम केल
मन तिथे तुला शोधायला जातं

-


1 DEC 2019 AT 6:10

सगळं काही माहित असताना
उगाच वेड्यासारखं वागतो
सांडणार आहे कधीतरी .....
अळवावरचा थेम्ब
पण त्याच्या कोसळण्याची
वाट पाहत थांबतो....

-


30 NOV 2019 AT 6:22

रात्री नवं स्वप्न घेऊन
निजलेली ती
उजाडण्याआधीच
विझलेला मी

-


28 NOV 2019 AT 5:33

ढळता रात्र जराशी,
ती मोहरली होती ,
सारं संपवूण सुद्धा,
थोडीशी उरली होती. .!

-


27 NOV 2019 AT 6:29

त्या बांधावरच्या झाडांना
एक आस कायम असते
पाखरं घरटी सोडून गेली तरी
परतीची इच्छा अमाप असते

-


Fetching Tejas Sonawale Quotes