खेळण्यात दंग होते, तुज खेळताना पाहिले मी
हरण्यात आनंद कसला, ते आज अनुभवले मी...
नभ दाटून येता येता, शहारे आले अंगावरी
भान हरवून बसले, तुज भिजताना पाहूनी...
ओले कसे हे अबोल डोळे, तव दूर जाता पाहिले मी
ऊन सावलीचे खेळ, नकोसे झाले माझ्या मनी...
कोवळे से ऊन आले सावरत त्या ओल्या सरी
बोलके झाले हे डोळे, पुन्हा तुज खेळताना पाहुनी...!
-