Shailesh Nanal   (Shailesh Nanal)
159 Followers · 6 Following

Joined 28 August 2019


Joined 28 August 2019
9 HOURS AGO

और उसे पाने की जानलेवा चाहत
बस आंखों से ही होती है
प्यार की पहल

-


9 HOURS AGO

उच्चतम भक्तांमध्ये क्षणाक्षणाला भगवंता विषयी उत्कट असे प्रेम उंचबळून येत असते.विशुध्द अशा प्रेम धारांनी भिजण्यासाठी परमेश्वर सगुण रुप धारण करुन अत्यंत गुप्त आणखी रहस्यमयरीत्या अशा भक्तांना भेट देत असतो.

-


10 HOURS AGO

ज्याच्या गुढपणाने भगवंत सुखावतो तो आस्तिक, ज्याच्या शहाणपणाने भगवंत दुखावतो तो नास्तिक तर ज्याच्या मुढपणाने भगवंत नाचू लागतो तोच सद्गुरु

-


10 HOURS AGO

सत्पुरुष कुठेही भावनिक रित्या गुंतत नाहीत पण सत्पुरुषामधे जे भक्त भावनिक रित्या गुंततात त्यांना साधनेच्या कुठल्यातरी टप्प्यावर निःसंशय आत्मस्वरूपाची प्राप्ती होत असते.

-


26 APR AT 12:09

निरंतर उपासनेने जीवनाची शक्ती वाढते म्हणजेच उपस्थित जीवन अत्यंत व्यापक अशा संज्ञेने जगले जाते.अर्थातच जीवन जेव्हढ्या प्रमाणात व्यापक होईल तितकेच ते सुख आणी दुःख तितक्याच संवेदनशीलतेने अनुभवू शकेल.पण सत्पुरुष वाट्याला आलेले सुखदुःखाचे क्षण अत्यंत उत्कट आणी जागृत अशा जाणीवेने जगत आपल्या जीवनशक्तीतूनच आवश्यक तो बोध घेत अनमोल असे ज्ञान मिळवतात जे सहजासहजी कोणालाही प्राप्त होत नाही.अनुभवत असलेले सुखदुःखाचे क्षण हा सुध्दा ईश्वराचा आशीर्वाद असा भाव ठेवून अत्यंत आनंदाने स्वीकारतात.

-


26 APR AT 9:30

आध्यात्मिक जीवन हे क्रमशः विकसित होत असते.उपासना ही प्रत्येक टप्प्यावर जीवाला जाणीवेची विशिष्ट अशी अवस्था प्राप्त करुन देत असते.जीव कालांतराने जे जरी मायेत गुंतला वा निषिध्द कर्मे करुन देहाने पतन पावला तरी जाणीवेची ही अवस्था या घडामोडीं पासून अस्पर्शच राहते.पुढील जन्मात त्याच्या आध्यात्मिक नियती नुसार उपस्थित जाणीवेपासुनच त्याचा आध्यात्मिक प्रवास सुरू राहतो.या कारणाकरीता सद्गुरु निरंतर उपासनेचा आग्रह धरतात जेणेकरून साधकाला चालू जन्मातच जाणीवेची जास्तीतजास्त उच्चतम आणि व्यापक अशी अवस्था सुखेनेवतेने प्राप्त व्हावी.

-


25 APR AT 9:12

जीव हा काळाच्या पकडीत आहे आणी जीवाचे शरीर, मन व त्याची भौतिक जगातील सर्व प्रकारची स्थिती म्हणजे जन्म, वृध्दी, क्षय आणी मृत्यू ह्यावर काळाची सत्ता चालते.जीव जसजसा साधना प्रवण होत जातो तसतसा शिव स्थितीत स्थिर होत जातो म्हणजे त्याचे मूळचे जीव स्वरुप हळूहळु शिवस्वरूपातच विलीन होते व अंती तो शिवस्वरुप पूर्णतः प्राप्त करतो.तदनंतर त्याच्या देहरुपी अस्तित्वावर असणारी काळाची सत्ता हळूहळू क्षीण होऊ लागते.शिवस्वरुपाला प्राप्त अशा महात्म्यांच्या भौतिक जीवनाचे नियोजन ही गुरुतत्व अगदी लक्ष देउन करीत असते.

-


25 APR AT 8:33

Reach



participate wholeheartedly in the very process of a reaching.

-


24 APR AT 9:01

The only talent required in the spiritual sphere is to release the self easily into the borderless eternal existence.

-


24 APR AT 8:14

The Beauty of the body is always well attended and rarely the beauty of innate nature which is the soul.

-


Fetching Shailesh Nanal Quotes