राहुल पिसाळ (रांच)   (रांच)
90 Followers · 77 Following

Joined 26 May 2020


Joined 26 May 2020

ती भीती जाणवली
तिच्या आज सोबतीला
ती कित्येक वेळ एकटीच
काहीतरी बडबडत होती
ती बडबड माझ्या सोबती
आज माझ्या घरी आली होती
घराच्या भिंती पेक्षाही त्या भिंती
आपल्याच माणसांना स्वाभिमाने
सांगाव्यात वाटतं होत्या...
याही भिंती कोणाच्या व कशासाठी?
उत्तर मात्र आपणच शोधायचं
क्रांती प्रतिक्रांती होत राहतील
आपण मात्र कृती करता येईल काय!
यासाठी प्रयत्नशील राहूयात!

-



तू भेटीत भेटली
असेही झाले नाही
नजरेतून भेटत गेली
तरी बोलली नाही
तू समोरून गेली
अशीच कित्येकदा
अन् मी माझ्याशीच
कितीदा बोलत गेलो!

-



तिला आशा होती
मी काही व्यक्त होण्याची
मी आता शांतच होतो
आता होत नाही हिंमत
कोणत्याही व्यक्तीत गुंतण्याची!

-



उरलोच किती
नात्यात आपणही
नव्हतेच काही
हे पटवू डोळ्यांनाही
तरी शिल्लक बाकी
हीच तर व्यवहाराच्या
पलिकडली नाती

-



काहीतरी मागे अजूनही
तसेच उरले आहे
नकळत माझे बालपण
केव्हाच सरले आहे

-



वाटले होते,सुख कधी!
दाटले होते,नजर चुकी!
माझी काही,नजर पलिकडे!
मीही कधी,तसे पाहिले नव्हते!

-



प्रेम तर निमित्त
गरज सोबत जगायची
सुख दुःखाची गोष्ट
एकत्रितपणे निभावायची

-



तुझ्या नजर रोखीने
माझीच हिंमत ढासळते
उगाचच कोणाची कविता
कोणावर भीतीने शहारते!

-



मलाही असे वाटले होते
कुणीतरी आपल्यासाठी
झुरले, हळहळले असावे
मलाच उगाच वाटे
मीच बोलू शकलो नाही
कुणीतरी मनात असूनही
हिंमतच करू शकले नसेल
ओढ खोल मनाची
का बरं पर्वा जनाची

-



तुझ्या वरती लोभ माझा
तरी नाही बोलणे झाले
तुझ्याच प्रतिमांचे जाळे
किती चेहऱ्यांवरती पाहिले

-


Fetching राहुल पिसाळ (रांच) Quotes