अमोलविजयविशाखा कांबळे   (रोखठोक..एक वादळ)
189 Followers · 5 Following

दिग्दर्शक/लेखक/कवी
८१०४४८०८८५
Joined 23 June 2018


दिग्दर्शक/लेखक/कवी
८१०४४८०८८५
Joined 23 June 2018

तशी तु आवडतेस

तशी तु आवडतेस....पण साला सांगताच येत नाही
नशीब पण असं ना मनातले शब्द माझ्या कवितेत उतरवता येत नाही

फक्त आठवण येते तुझी तु शब्दात येत नाही
स्वप्नात मात्र येते हृदयातुन तु काही केल्यास जात नाही

नक्षत्रासारखी पोर तु चंद्रासारखी कोर तु
तुझी आठवण रात्र रात्र जागवते भेट मात्र होत नाही

समोर येते तेव्हा तुला पाहत राहतो मी
शब्द फुटत नाही तेव्हा ओढ मात्र तुझी हटत नाही

तु पण हट्टी अशी ना हातात हात घेत नाही
तुझ्या प्रेमाचा वारा गावात माझ्या वाहत नाही
तशी तु आवडतेस....पण साला सांगताच येत नाही



-



अन्यायाला वाचा फोडल्या जातील

बलात्कारी माणसाला जामीन दिला जातो,
वेदना सहन करणाऱ्या व्यक्तीला वेगळ नाव दिल जात,
उच्च नीच फरकातून हा बलात्कार नव्हताच,
हे न्यायाधीश महोदय तुम्ही दिलेलं उतर असत,

कोणता न्याय कोणती बाजू मांडतो,
हे वस्तूवर नाही तर पैशावर ठरवलं जात,
बलात्कारी पडीत स्त्रीच्या अस्मितेवर काळिमा फासणार,
हे पैशाच गणित साऱ्यांनाच विकत घेत असत,

हि वेळ आता अन्यायाला वाचा फोडणारी होती,
तो पेन तिथेच मोडणारा होता,
उसळी होती ती लाट ,
न्याय मिळवून देणारी शब्दांची ताकद होती.

-



इथे बलात्काराच्या नावावर न्यूज बनवली जाते
किती तरी बलात्कारी आरोपीना मग मुभा देऊन मुक्त केलं जातं

-



चहा म्हंटल की तू आठवते
कॉफी म्हटलं की प्रेमात फुलते

-



तो हल्ला

पुस्तकांचा खजिना कधीच संपणार नाही
कितीही हल्ले करा आमच्यावर आम्ही कधी माघार घेणार नाही

जातीच्या अहंकाराने आज तुम्ही माजलात आहे साल्यानो
समोर हल्ले करायला घाबरता आहे नालायकांनो

आज हल्ला केला त्या शब्दांवर ज्या शब्दाला धार आहे तलवारीची
लेखणी आहे मजबूत माझ्या भीमाची नाही मोडता येणार तुम्हा हरामखोरांनो

जातीचा वणवा पेटवताना स्वतःला देखील आग लागेल हे ध्यानात ठेवा
आणि मागून हल्ले करणारे ना मर्द म्हणून स्वतःची ओळख साऱ्याला जगाला पटवून द्या

नव्या विचारांच्या माणसाला घडताना तोडणारे तुम्हांला काय कळणार किमया पुस्तकांची
जाळून टाकाल त्या शब्दाला पण राख होऊन तो शब्द कायम अजरामर राहील

-



जातीत प्रेम पाहिलं ?

जातीसाठी आम्ही नेहमी लढतो
जीव घेण्यासाठी आम्ही नेहमी पुढे सरतो
आली कोणती वेळ तर जातीत जात
वर्गीकरण करून माणसालाच माणूस संपवतो

प्रेमाला जात नसते म्हणणारे
जातीवादी दंगे घडवत आहे
प्रेम वरच्या जातीत केलं म्हणून
विराज जगताप सारख्या मुलांना हे मारत आहे

अरे हरामखोरांनो हिम्मत असले तर
समोरून वार करून दाखवा
वरची खालची जात करून
माणसाला का मग मारता

प्रेम करणं कोणता गुन्हा नाही
हिजड्याची औलाद आहे
म्हणून अशा जातीवादाला
संपवणे आमचा अधिकार आहे

-



न्याय हक्क

आज हत्येचे दंगल साऱ्या जगात पसरले होते
मृत्यूच्या सापळ्यात मग ही साधी जनता फसली होती

जातीच्या अहंकाराने माणूस माणसाला मारतोय
कोणी आमदार आहे म्हणून तो अरविंद बनसोडे ला संपवतोय

हा खुलेआम भाईगिरी चा कट आहे
आमदार आहे म्हणून तो साला भिकारीच आहे

आता तो आमदार खुलेआम फिरतोय
अरविंद बनसोडेच्या न्यायासाठी समाज एक होतोय

धमक्या शिव्या देणारे भाडखावं आज लपून बसलेत
आमदार बनून मग खिशात हत्यार वापरू लागलेत

आता त्या आमदाराला लपवले जाईल
सत्यते असलेलं सरकार मग न्याय आमदाराच्याच बाजूने देईल

-



हत्याकांड

तो हत्याकांड जाणून बुजून केलेला वार आहे
शेवटी काय माणुसकीला काळीमा फासणारा तो क्रूर अपराधीच आहे

माणुसकी इथेच मरते जिथे तिला वाचवता येत नाही
माणुसकीच्या नावाखाली कित्येक जण बिनदास्त फिरतात जिथे त्यांना अडवता येत नाही

गुंडगिरी करणारे ते कित्येक जणांचे खून करत आहे
पिसाळलेल्या कुत्रासारखे सर्वाना चावा घेत आहे

मी त्या गुन्हेगारी वृत्तीला कधीच माफ नाही करणार
माणुसकीला संपवणाऱ्या भाड्याना कधीच माफ नाही करणार

-



अत्याचार रोखता येत नाही
पण अत्याचाराला संपवता येत

-



तो घाव घातला रे

तू घाव घाल मानवा
मी तो झेलणार आहे
तुझ्या मनातल्या विचारात
मी एक दिवस येणार आहे

न संपलेल्या विचाराला
पुन्हा उठवायचे आहे
झोपलो जरी मी
तरी मला जागायचे आहे

असा का तो
विचार बदलतो
मानवा तुझ्या विचाराला
तो का पुन्हा संकटात पाडतो

घेतला जाईल जीव
तुमचा आमचा
का मग तो मला
आगीत ओढत असतो

-


Fetching अमोलविजयविशाखा कांबळे Quotes