Akshara Dhage  
304 Followers · 10 Following

Joined 1 May 2019


Joined 1 May 2019
19 APR AT 0:07

चुका सार्या पोटात गेल्या,
माझी मात्र तशीच आहे;
सार्यांची मनं जपली गेली,
माझे मात्र उपाशीच आहे;
गेला श्वास तरी कदाचित,
कोणी बघणार नाही;
नाही...काळजी करू नका,
माझ्या मरणाला ही दोषी;
मी कोणालाच धरणार नाही...
कु. अक्षरा संतोष ढगे.

-


29 SEP 2023 AT 22:20

बोलणं.........ऐकणं.
एखाद्याच्या बोलण्यातून बर्याच गोष्टी स्पष्ट होत असतात, मग ते बोलणं गोड असो वा तिखट. नाही...समजत नाही काहीच असं कोणीच नाही येथे, दुनियादारी जपण्याची कला प्रत्येकालाच येते. माञ स्वार्थापोटी गोड बोलणं यापेक्षा स्वार्थापलिकडे जाऊनही गोड बोलता येणं हे गरजेचं आहे. आणि एखाद्या गोष्टीला सहज पणे स्विकारणं चांगलंच; मात्र कधी जर वेळ आलीच तर विरोध करून थोडं तिखट व्हायला काहीच हरकत नाही. शेवटी बोलण्यातला गोडपणा किंवा तिखटपणा यातील हेतू निर्मळ असणं महत्वाचं. तेव्हाच त्या गोडीची चव द्विगुणीत होऊन असलेला नसलेला तिखटपणा कालांतराने कुठल्या कुठे नाहीसा झालेला असेल.
बोलणं थोडक्यात असो वा मनमोकळं, गोड असो वा तिखटं, हेतूतील निर्मळता हीच कायम टिकणारी महागडी गोष्ट आहे. कारण बोलणार्याला समजो अथवा न समजो मात्र अगदीच नाही तर थोड्याफार फरकाने मात्र ऐकणारी व्यक्ती ही बर्याच गोष्टी कळत नकळत हेरत असते आणि शेवटी एवढंच म्हणता येईल...प्रत्येकाचं बोलणं प्रत्येकाला समजतच असते. नाही का?
कु. अक्षरा संतोष ढगे.

-


26 JUL 2023 AT 1:01

हर हाल में तुमसे प्यार है।

हर हाल में तुमसे प्यार है,
उस चाँद का इंतजार है।
आधा है चंद्रमा तो क्या हुआ?
थोडे दिन का ही तो ये हाल है;
बस, उस पूनम का इंतजार है।

आधी मैं आधे तुम और,
मनकी गहराई जब हो हमारी;
फिर सजनेवाले उस अमोल
इजहार का इंतजार है।
हर हाल में तुमसे प्यार है,
उस चाँद का इंतजार है।
कु. अक्षरा संतोष ढगे.

-


4 JUL 2023 AT 1:26

'गुरू' अवघ्या दोन शब्दांमध्येच आपल्या जीवनाचा अर्थ दडलेला आहे. जेथे "ज्ञान तेथे गुरू" आणि जेथे "गुरू तेथे ज्ञान" आहे. गुरू म्हणजे एखादी व्यक्ती किंवा गोष्ट नसून सर्व सजीव-निर्जीव, अगदी सूक्ष्मकणांपासून ते आभाळाचे सामर्थ्य असलेले कोणीही आपले गुरू असू शकतात.
दिसणारे प्रत्येक द्रव्य मग ते घन, द्रव, किंवा वायू असो; एवढेच काय, सदृश्यच नाही तर अदृश्य गोष्टीही आपल्या आयुष्यातल्या ज्ञानाचा एक महत्वाचा अविभाज्य भाग आहेत. आणि जगण्याची कला आपण यातून आजमावत असतो. ते म्हणजे आपल्या 'भावना'. मग त्या राग, द्वेष असो किंवा असो माया, आपुलकी आणि निखळ प्रेम. यातून नाजूकपणे आपण शिकत असतो. आपण आपल्या आणि अशा कितीतरी मनांचा जवळून अभ्यास करत असतो. कळत नकळतपणे घडत असतो. त्यामुळे थोडक्यात सांगायचे तर "हे विश्वच एक ज्ञानाचे भांडार, आणि गुरू आहे."
ज्ञान घेताना या ज्ञानामुळेच आपण बरेच घाव पचवून पुढे जायला शिकतो. असे प्रत्येक घाव, प्रत्येक विचार, आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतोच. आणि तेथे पोहोचल्यानंतर मात्र जे घाव वाटले ते घाव नसून आपल्या पंखात उंच उडण्यासाठी दिलेले बळ अर्थात ज्ञान आहे; याची अनुभूती आल्यावाचून राहत नाही. त्यामुळे अशा "सर्व गुरूंना गुरूपौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा"...
कु. अक्षरा संतोष ढगे.

-


5 MAY 2023 AT 22:55


दुःख रोज थोडे येथे,
गगनाला भिडत आहे;
वेदनेची आग तितकी
आतून चिरत आहे;
खिळखिळ्या करत मनाच्या भिंती,
काय ती, फिरत आहे?
मग बघुदे तिला ही,
मी पण आहे ऊभी इथेच,
अन् किती निर्भीड आहे...
कु. अक्षरा संतोष ढगे.

-


4 MAY 2023 AT 12:06

आपली उणीव भासते याची कोणाला जाणीव होणं, आणि कोणीतरी हे स्पष्टपणे आपुलकीने सांगणं म्हणजे, माणसाने माणसाला जगण्यासाठी दिलेलं त्या त्या नात्यातलं समाधानाचं सुख. नाही का?
कु. अक्षरा संतोष ढगे.

-


23 OCT 2022 AT 18:40


When our siblings are younger than us, we become a little younger again and experience some of the joys of childhood.

Sometimes being YOUNG is a JOY.
कु. अक्षरा संतोष ढगे.

-


25 SEP 2022 AT 23:49

आज माझ्या अक्षरात तुला रेखावं म्हणते
कवितेत, म्हणजे ती अमोल होतील...
कु. अक्षरा संतोष ढगे.

-


19 AUG 2022 AT 22:57

आसमंतात गोविंदा...

कान्हा आहे तो,
साधा-सुधा नाही;
आज म्हणे सोबत त्याच्या,
राधासुध्दा नाही,
कृष्ण-लीला भाळली नाही,
असा प्रांत आज नाही,
फुटली नाही हंडी असा,
आसमंत आज नाही...

कु. अक्षरा संतोष ढगे.

-


7 AUG 2022 AT 22:41

मैत्री...
मैत्रीचे क्षण कागदावर उतरवणे, म्हणजे असंख्य तार्यांमधला एखादा तारा चमकावा, नी तरी त्याच्या प्रकाशाने आपण आनंदून जावं; अर्थात मैत्री कितीही मांडली, लिहीली, सांगितली तरी हुबेहुब भावनांचा मेळ, फक्त ती अनुभवणार्यालाच समजतो. त्यामुळे ज्या संगतीला कुठल्याच बंधनाची मर्यादा नाही तिला शब्दांत काय बांधनार?
मात्र तिच्यामुळे जे मिळालंय, ते अफाट आहे. कोणतीही मर्यादा न ठेवता, एक मन अलगद दुसर्या मनाला जाऊन भिडते, फक्त भिडतंच नाही, तर बर्याच गोष्टी शिकवून जाते, सुखदु:खात सोबत करते. अन् सहवास आवडलाच तर आयुष्यभर अशी अनेक आपुलकीची निस्वार्थी, मी पणाचा लवलेश नसलेली मनं कायमची आपली होतात. आपल्या मनावर राज्य करतात, मनात वास करतात....
कु. अक्षरा संतोष ढगे.

-


Fetching Akshara Dhage Quotes