Gopal Gote   (Gopal Gote)
737 Followers · 385 Following

read more
Joined 4 September 2021


read more
Joined 4 September 2021
13 MAY AT 1:00

कारणं असंख्य असतात,
मनाची घालमेल होण्यासाठी.
मनाने मात्र तयार असावं,
विचारांना दूर लोटण्यासाठी.

-


8 MAY AT 20:41

ते वाळलेल झाड....

ते पूर्णपणे वाळून गेलं आहे.
पण, त्याचा आत्मविश्वास अजुन जिवंत आहे.
ते वाट पाहात आहे,
येणाऱ्या मृग नक्षत्राची.
त्याला भीती फक्त एवढीच,
की माणसाची नजर त्यावर पडू नये.

-


4 MAY AT 20:30

एक दिवस असही व्हावं...
सहजच एका सायंकाळी
अशा छोट्याश्या रस्त्यावरून भटकंती करावी.
कुठे चाललो का चाललो माहित नसावं.
वेळेचही भान नसावं.
फिरत फिरत बऱ्याच वेळानंतर स्त्याच्या कडेला एक दुकान दिसावं.
तिथे जाऊन चहा घ्यावा,
आणि दुकानातील त्या व्यक्तीकडे बघुन भूक नसतानाही काही तरी अजुन घ्यावं.
दुकान बंद करताना अजुन थोडा खप झाला म्हणुन,
त्या दुकानातील माणसाच्या चेहऱ्यावरील आनंदाकडे बघत राहावं.
परत उठाव आणि चालावं त्याच रस्त्यावरून,
जोपर्यंत अंधार होत नाही तोपर्यंत.
अंधार झाला की मन भानावर यावं.
कुठे आहोत याची जाणीव व्हावी,
आणि आपण इथे कसे आलो आणि का आलो,
याच विचारात मुक्कामाच्या ठिकाणी परत यावं.

-


23 APR AT 23:54

काही कमी असलं तरी अडचण
काही जास्त असलं तरी अडचण
हेच या कलियुगाच सार आहे
हेच जीवनाचं गणित का एकदा कळलं,
की मग जीवनाचा भवसागर पार आहे.

-


16 APR AT 1:27

अपवादात्मक दुःख.....

सगळीच दुःख जगासमोर व्यक्त झाल्याने कमी होत नाहीत.
प्रत्येकाचं अपवादात्मक, आपलं म्हणावं अस एक दुःख असतंच,
ते दुःख जगाला कळता कामा नये.
जोपर्यंत ते आपल्या पर्यंत मर्यादीत आहे, तोपर्यंत ठीक.
पण एकदा का ते जगाला कळलं,
की त्याचा गुणाकार सुरू होतो, एवढं मात्र नक्की.
ज्या दिवशी ते "अपवादात्मक दुःख" ओळखता आलं,
त्या दिवसापासून जीवन थोड सुकर होऊन जात.

-


7 APR AT 1:44

निसर्गाशी संवाद साधताना,
जेव्हा शब्दही संपत जातात,
तेव्हा भावना बोलू पाहतात.
अपूर्ण राहिलेला संवाद,
त्याही पूर्ण करू पाहतात.

-


30 MAR AT 23:01


आजकाल एकांतातही मी माझ्या मनाला,
एकटं कधीच सोडत नाही.
आणि सोडलंच त्याला कधी एकटं तर ते,
जुन्या आठवणींचा गाठोड सोडल्याशिवाय राहत नाही.

-


30 JAN AT 21:56

एकदा तरी त्या वाऱ्यासारखं होता आलं पाहिजे.

वाऱ्याच्या मागावर जात आलं पाहिजे,
जमिनीपासून थोड वर आणि ढगांच्या थोडं खाली उडता आलं पाहिजे.
एकदा तरी त्या वाऱ्यासारख होता आल पाहिजे.
उंचच उंच उडून सुद्धा जमिनीवर येता आल पाहिजे,
एकदा तरी त्या वाऱ्यासारखं होता आलं पाहिजे.

-


17 JAN AT 22:26

तुम्ही यश संपादन केलं का?, तुम्ही सुखी आहात का?, तुमच्याकडे भरपूर धन आहे का? या प्रश्नांची उत्तरे तुम्ही यश, सुख, इत्यादी गोष्टींच्या व्याख्या काय करता यावर अवलंबून आहे....

-


27 DEC 2023 AT 19:18

वेळ...
वेळ कशी निघून जाते कळतही नाही.
वर्षां मागून वर्ष संपतात.
माझं पुढे काय, माझं पुढे काय, असं करता करता.
आपल्या माणसांचा हात सुटत चालल्याची जाणीव,
होत नसावी कदाचित.
आणि जेव्हा ही जाणीव होते,
तेव्हा आपल्यांचा हात कधीच सुटलेला असतो.
कदाचित भावनाही बोथट होऊ लागतात,
आपल्यांना सोडून एक क्षणही न राहणारा,
वर्ष वर्ष सुद्धा आठवण काढत नाही.

-


Fetching Gopal Gote Quotes