17 APR 2017 AT 8:28

ती....एक प्रेयसी..

अवकाशातून कुठून तरी अवचितपणे ती येते....
सफेद कॅनव्हास वर सप्तरंगांचे फटकारे मारण्यासाठी...
बेरंगी आयुष्याचा रंगच बदलून जातो मग..
कधी चिरतरुण हिरवा, तर कधी प्रणयधुंद गुलाबी,
कधी निळ्याशार डोहाचा गर्द निळा, तर कधी
विशाल आभाळाचा फिकटसर आकाशी,
ही कलाकृती पूर्ण होत असतानाच ,
कुठुनशी गडद काळ्या रंगाची हलकीशी छटा येते आणि....
चितारलेल्या कॅनव्हास चा पोतच बदलून जाते...
आताही त्या चित्रात सप्तरंग दिसतीलही..
पण ती गडद काळी छटा...
कधीही न पुसली जाणारी...
काळीज चिरल्यावर पात्यावर उमटणारी...

- $VikasPawar$