दारातील वृंदावन स्मारकातली
लोटाभर जलाच्या धारेतली।।
हिंदु संस्कृतीच्या पावित्र्यातली
तुळस माझ्या अंगणातली।।
हळदि-कुंकवाच्या करंड्यातली
दिपाच्या दिव्य ज्योतीतली।।
कृष्णाच्या विराट हृदयातली
तुळस माझ्या अंगणातली।।
स्वच्छ आक्सीजनच्या पेल्यातली
शरीर आरोग्याच्या आयुर्वेदातली।।
संजीवनी मंत्राच्या समाधीतली
तुळस माझ्या अंगणातली।।
पान ,खोड ,मंजुळफुले
रामबान औषधांच्या वंशातली।।
शुभमुहूर्ताच्या सोहळ्यातली
शामा ,गौरी ,रानतुळस माझ्या अंगणातली।।
~Madhuri P. Warwatkar
-