चंद्रासारखा चेहरा तुझा,
चांदण्या सारखे टीमटीमनारे डोळे.
दिसते नाजूक पाकळी,
पण हाव भाव आहे तिचे भोळे.
राग असून मनामधे,
प्रेमाने ती नेहमी बोलते.
बोलता बोलता नेहमी,
राग व्यक्त करायला ती विसरते.
हास्य तुझ्या गाली,
फुलासारखे खुलते.
तुझ्या गालावरची खळी,
वेगळीच चमक भासवते.
नेहमी हसरी,आनंदी असतेच,
आणि रहाविच तू,अशी आहे अशा.
तुझ्या लिखाणाचं काय बोलू,
त्याची तर भिन्न भिन्न आहे भाषा.
अशीच आहे मनोकामना..की,
सुखी, सर्व संपन्न तू रहा.
तुला आज शुभेच्छा मी देतो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्नेहा.
-