28 APR 2017 AT 10:30

सूर, शब्द, स्पर्श सारे तुझे
चाल, बोध, अर्थ सारे माझे
तेज, दिवस, सूर्य सारे तुझे
रात्र, तिमिर, चन्द्र सारे माझे
देह, धर्म, वर्ण सारे तुझे
चित्त, वृती, मर्म सारे माझे
ओसंडून वाहते दान तुझे
मन भरून हात रिते माझे

- Inkblot