आणि तु माझा झालास...
एक अनोळखी सावली बनून तु नकळत माझ्या आयुष्यात आलास
काही काळ लोटला,आणि बघता बघता तु माझा झालास..
सुरवातीच्या काळात,तुझ्या लखलखत्या हास्याकडे आणि चमकत्या डोळ्यांकडे बघायचे
कानावर फक्त तुझे शब्द,पण मन मात्र तुझ्या सहवासात रमायचे..
दिवसा मागुन दिवस सरले आणि दोघांची मने आणखी जवळ आली
तुझ्या हसण्यात,रडण्यात,सुख दु:खात थोडक्यात तुझ्या आयुष्याचा मी अविभाज्य भाग झाली..
खुप समजावले मनाला की असशील क्षितिजा प्रमाणे, होत असावा मला,..तु माझा असण्याचा भास
जितक्यांदा तुझ्यापासून दुर गेले,तितकाच जवळ होत गेला तुझा सहवास..
मी मनाभोवती बांधलेले कुंपण तु अलगद सरकावुन आत आलास
माझ्या वेंधळ्या मनाला प्रेमाने कुरवाळलेस,
आणि बघता बघता तु माझा झालास...आणि बघता बघता तु माझा झालास...
-